आधार कार्ड च्या नवीन नियमाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांकावरून एकापेक्षा जास्त पॅन तयार केले जाऊ शकतात. त्यामुळे पॅनचा गैरवापर होऊ शकतो, हा गैरवापर थांबवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. पॅन कार्ड हे व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे, त्यामुळे त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
आधार आणि आधार नोंदणी क्रमांकामध्ये काय फरक आहे?
आधार कार्डचा आधार क्रमांक हा 12 अंकी क्रमांक असतो. तर आधार नोंदणी क्रमांक हा 14 अंकी क्रमांक आहे. आधार अर्ज भरताना आधार नोंदणी क्रमांक दिला जातो. त्या क्रमांकावर तारीख आणि वेळ ठरलेली असते. आता नोंदणी क्रमांकावर पॅन दिला जाणार नाही, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.